
लातूर :- दिनांक १९ { दिपक पाटील} : मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी राजे शिवाजी नगर ( वसवाडी ) लातूर येथे सापळा लावून अविनाश उर्फ बापू तानाजी येमगर वय २७ वर्ष रा.रामवाडी ता.जी. उस्मानाबाद ह.मू. राजे शिवाजीनगर, लातूर व मच्छिंद्र दत्तात्रय क्षीरसागर वय २५ वर्ष ,रा.किल्लारी ,ता.औसा.जि.लातूर ह.मु. वाल्मीकी नगर ,लातूर यांना राजे शिवाजीनगर { वसवाडी } येथून दोन चोरीच्या मोटरसायकल सह रंगेहाथ पकडले व त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यानी सदरील मोटरसायकल चोरीच्या असल्याचे सांगीतले, त्यावरून त्यांना विश्वासात घेतले असता , त्यांनी सांगितले की, लातूर शहर, मुरुड, औसा येथून मोटरसायकल चोरल्याचे सांगितले ,त्यांच्याकडून तब्बल १९ दुचाकी किंमत ११ लाख पंधरा हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्या कडे अधिक विचारपूस केली असता, त्यांचे इतर दोन साथीदार नामे १} तुकाराम मनोहर कुंभार रा.हारेगाव ता.औसा जि.लातूर ह.मु. राजे शिवाजीनगर { वसवाडी } व सुनील उर्फ बाळा वसंत कोळपे रा.तेर ता.जी. उस्मानाबाद हे दोघेजण फरार आहेत, वरील चारही आरोपी मोटर सायकल चोरी करुन गुन्हे करीत असल्याची व मोटरसायकलची खातरजमा केली असता एमआयडीसी पो.स्टे. ,विवेकानंद चौक पोलीस स्टेशन , शिवाजीनगर, मुरुड, औसा येथे गुन्हे दाखल असून, ह्यातील दोन आरोपी राजे शिवाजीनगर { वसवाडी} येथे आल्याची गोपनीय माहिती पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण पठारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहिद शेख, पो.हे. काॅ. रामचंद्र ढगे, पो.ना. महेश पारडे, पो.ना. अभिमन्यु सोनटक्के, पो.काॅ. गणेश मोरे, पो.काॅ. सोमनाथ खडके यांनी सहभाग घेतला. पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना अवहान करण्यात येते की, आपल्या मोटरसायकल सुरक्षित ठिकाणी हॅन्डल लाॅक करून लावाव्यात व जुने वाहन खरेदी करताना कागदपत्र पाहनी करून घ्यावेत तसेच सदर काही संशयास्पद वाटल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावे. १९ तारीख दुचाकी पण १९ जप्त हे समीकरण छान जमले आहे, चोरांच्या मुसक्या आवळल्या मुळे नागरिकामधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.