Spread the love


उमरगा { दिपक पाटील } – पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज करत असताना दिनांक 31/10/2022 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सपोनि समाधान कवडे यांना गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, उमरगा शहरा लगत असलेल्या हॉटेल गंधर्वच्या उत्तर बाजूस एचपी पेट्रोल पंपाच्या आवारात आयशर टेम्पो क्रमांक एम एच-१३-ए एक्स- ३७१६ हा संशयित रित्या बराच वेळ उभा असल्याचे बातमी मिळाल्याने सपोनि कवडे यांनी सदरील गोष्ट वरिष्ठांना माहिती देऊन सोबत पोलिस अंमलदारसह सदर जागेवर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी वरील आयशर टेम्पो बंद व दरवाजा लॉक केलेल्या स्थितीत मिळून असल्याने त्यांनी वाहनाचे पाठीमागील ताडपत्री वर करून पाहिले असता सदर वाहनात पांढरे रंगाचे पोत्यामध्ये

गुटखा सदृश्य अन्नपदार्थ दिसून आल्याने त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी व इतर वाहनाचे चालक यांच्याकडे सदर आयशर चालकाबाबत माहिती घेतली असता त्यांना चालकाबाबत माहिती मिळाली नाही त्यामुळे त्यांनी थोडा वेळ गाडीचा चालक किंवा गाडीचा मालक आयशर कडे येतो का याची वाट पाहून सदर ठिकाणी कोणी आले नसल्याने सदर आयशर टेम्पो आतील मालासह वाहन जप्त करून पोलीस ठाणे येथे लावून ठाण्यात नोंद घेऊन अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग उस्मानाबाद यांना टेम्पो मधील गुटखा सदृश्य पदार्थाची तपासणी होणे बाबत पत्र दिले असता आज रोजी श्रीमती नसरीन तन्वीर मुजावर अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी पो.स्टे उमरगा येथे येऊन सदर आयशर टेम्पो चे निष्पन्न चालक नामे अजीम करीमसाब शेख वय ३८ वर्ष रा. हमीदनगर उमरगा याचे समक्ष त्याचे कब्जातील आयशर वाहनाचे आतील मालाचे पंचनामा करून पाहणी केली असता सदर वाहनात एकूण ३५ मोठे पोते प्रत्येक पोत्यामध्ये लहान सहा पोते दिसून आले. सदर लहान पोते उघडून पोत्याची पाहणी केली असता प्रत्येक पोत्यामध्ये गोवा १००० कंपनीचे ५५ पाकिटे प्रति पाकीट किंमत अंदाजे २०० रुपये असे एकूण २३,लाख दहा हजार रुपये किमतीचे गोवा १००० कंपनीचे गुटखा व आयशर टेम्पो किंमत अंदाजे ५ लाख रुपये असे एकूण २८ लाख,दहा हजार रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करून पंचनामा करून श्रीमती नसरीन तनवीर मुजावर अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन आरोपी नामे आजीम करीमसाब शेख वय ३८ वर्ष रा. हमीद नगर उमरगा ता.उमरगा याचे विरुद्ध कलम- २७२, २७३, १८८, ३२८ भा.दं.वि. सह कलम-२६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२) अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६ अन्वये फिर्याद दिल्याने,पो.स्टे.उमरगा गु.र.नं.- ५५२/ २०२२ कलम २७२, २७३, १८८, ३२८ भा.दं.वि. सह कलम- २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२) अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि क्षीरसागर हे करीत आहेत.तसेच सदरील कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उस्मानाबाद, अप्पर पोलीस अधीक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते उमरगा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान कवडे, पो.ना जाधव, पो.ना पठाण, पो.हे घोळसगाव, पो.का दिवे, चालक पो.हे. मेटे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!