Spread the love

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,01 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त, 06 गुन्हे दाखल, कासारशिरशी पोलिसांची ची कारवाई.

निलंगा – ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्याचा कार्यभार हातात घेताच अवैध चालणाऱ्या धंद्यावर लक्ष केंद्रित केले व कित्येक दिवसापासून बिन बोभाटपणे चालूच असलेल्या कासार शिरशी पोलीस स्टेशन हद्दीतील कोराळवाडी येथे हातभट्टीवर धाडी टाकण्यात आल्या, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा श्री.दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रेवनाथ डमाळे यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 06 इसमावर पोलीस ठाणे कासारशिरशीच्या पथकाने आज दिनांक 04/11/2022 रोजी सकाळी छापामारी केली.यामध्ये 2,600 लिटर रसायन ,साहित्य,हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 01 लाख 70 हजार रुपये चे रसायन,हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे.या कार्यवाहीत 1) साहेबा महादू कानडे , राहणार कोराळवाडी 2) संजय गोविंद पाटील राहणार कोराळवाडी3) राम अण्णाराव सबदाडे , राहणार कोराळवाडी4) नामदेव श्रीमंत सबदाडे , राहणार कोराळवाडी5) व्यंकट दौलाप्पा रेवणे , राहणार कोरडवाडी 6) दत्तू गुंडाप्पा बुकले , राहणार कोराळवाडी अशा एकूण 06 आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे कलम 65(फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 06 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर , पोलिस अंमलदार घोरपडे, तपसे, नरवटे ,भोंग, सोनटक्के ,इंदापुरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!