
दारूच्या नशेत झिंग होऊन मौजे टाका गावात दहशत निर्माण करणाऱ्या03 तरुणांना धारदार शस्त्रासह रात्री अटक.
भादा ( दिपक पाटील ) दि.16/11/2022 रोजी राञी 9.15 वाजता मौजे टाका ग्रामपंचायत समोर काही तरूण हातात धारदार शस्त्रासह गोंधळ घालत होते , तसा निरोप सजग नागरिकामधून भादा पोलीस यांना कळविण्यात आला , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी लगेच पोलीसांना तेथे पाठवून तीन जणांविरुद्ध दि.17/11/2022 रोजी पहाटे 01.08 वाजता गु.र.न. – 182/2022 कलम 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम, कलम 85 (1) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये.
पो.हे .अविनाश श्रीपती टोपे यांच्या फिर्यादीवरून
- अक्षय शिवराज होळकुंदे, वय 28 वर्ष, रा.जुना औसl रोड , लक्ष्मी कॉलनी,लातूर.
- करण सुरेश हजारे , वय-22 वर्ष,रा.याकतपूर रोड औसा,
- प्रकाश शहाजी सगर वय- 30 वर्ष रा.जुना औसा रोड,लगस्कर बिल्डिंग जवळ, लातूर. या आरोपी कडून एक धारदार कोयता अंदाजे किंमत. 100/- रू व एक होंडा कंपनीची एक्टिवा पांढऱ्या रंगाची एम एच २४ बीबी 50 74 अशी किंमत अं. 50,000/- रू. असा एकूण 50,100 /- रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला.यातील नमूद आरोपींनी दारूच्या नशेत मौजे टाका गावात आरडाओरडा करून दहशत निर्माण करून विना पास परवाना स्कुटी च्या डिक्कीत लोखंडी धारदार कोयता शस्त्र बाळगलेला मिळून आले व मा. जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सरकार तर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्यांचेकडून शस्त्र व गुन्ह्यात वापरलेले वाहन स्कूटी जप्त केले आहे. सदर तिन्ही आरोपींना अटक करून आज रोजी मा. न्यायालय औसा येथे हजर करण्यात आले होते ,सद्या ग्राम पंचायत निवडणुका तोंडावर आल्या असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन भादा कडून हद्दीत विशेष लक्ष असणार असून, बेकायदेशीर शस्त्र व अग्निषस्त्र बाळगलेले मिळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरील कारवाई नूतन मा.पो अधिक्षक- सोमय मुंढे ,व अपर पो अधिक्षक- अजय देवरे व पोलीस उपअधीक्षक मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे ,पो.हे. राजेंद्र देशमुख, अविनाश टोपे, कमाल शेख, सूर्यकांत गिरी, महेश चव्हान, केशव चौघुले, यांनी केली आहे.
