Spread the love


लातूर( प्रतिनिधी)आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 29 नोव्हेंबर  ते  30 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते  पहाटे 5 वाजेपर्यत लातूर पोलिसा कडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोंबिग ऑपरेशन राबविण्यात आले होते.यामध्ये पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून जिल्ह्यातील 25 अधिकारी व 103 पोलीस अंमलदारांचे अनेक पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. कोंबिग ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र जप्ती, अग्नीशस्त्रे जप्ती, फरार आरोपी अटक करणे, लॉज व हॉटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे,अभिलेखावरील गुंडाचा/गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता. 

त्यानुसार लातूर पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यावर दोन कारवाया केल्या असून 53 लॉजेस व हॉटेल तपासण्यात आले आहेत. न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या 22 आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यात विविध 22 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून 586 संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्ड वरील 65 सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले. मालाविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या  12 इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122(क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारु विक्री करणाऱ्यावर 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन मध्ये केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या कोंबींग ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!