
.
किनगाव (प्रतिनिधी) रेणापूर तालुक्यातील माकेगाव या गावातील पतीने पत्नीचा छळ केल्याप्रकरणी किनगाव पोलिस स्टेशनला सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी वर्षा राजकुमार लहाने मु. माकेगाव हिला पतीने मारहाण करून शिवीगाळ केली.तुला तर जिवंत ठेवणार नाही असे म्हणून लाकडाने डोक्यात मारहाण करून मुक्का मार दिला आहे. व फिर्यादीस मोटार सायकल घेण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये नाही तर मी पैसे दिल्याशिवाय तुला नांदविनार नाही असे म्हणून फिर्यादीस शारीरिक व मानसिक छळ जाचजुलम करून उपाशीपोटी ठेऊन घरातून हाकलून दिले.याप्रकरणी वर्षा लहाने यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजकुमार लहाने यांच्या विरोधात गुन्हा .गु.र.न. 235/2021 कलम 498 अ 324,323,504,506 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जोशी, एम एस पलमटे हे करत आहेत.
