Spread the love

04 व 05 डिसेंबर 2022 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया उस्मानाबादच्या ख़िदमते ख़ल्ख़ विभाग (मानव सेवा) तर्फे शहरातील गरजू लोकांना ब्लँकेट व कपडे वाटप करण्यात आले.

उस्मानाबाद (श्रीकांत मटकीवाले) मानव सेवा बद्दल इस्लामी शिकवणी ” तुम्ही एक सर्वोत्तम संप्रदाय आहात; ज्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी उभे करण्यात आलेले आहे. तुम्ही सत्कर्मांची शिकवण देता आणि दुष्कृत्यांपासून परावृत्त करता” (क़ुरआन शरीफ,सुराह आले इम्रान 111) या शिकवणीला आदर्श मानून आणि त्याच्यावर काटेकोर पणे अंमलबजावणी करत आम्ही दर महिन्यात मानव सेवा विभागा अंतर्गत वेगवेगळ्या जनकल्याण कार्य करत असतो.

अहमदिया मुस्लिम जमाअतचे संस्थापक हज़रत मिर्झा ग़ुलाम अहमद क़ादियानी (ईश्वर त्यांना शांती देवो) यांनी मानव सेवा बद्दल एका फ़ारसी (परशियन) श्लोका मध्ये असे सांगितले आहे “मानवतेची सेवा हाच माझा उद्देश,ध्येय आणि हेतू आहे.
हेच माझे कर्तव्य, माझे कार्य, माझी पद्धत आणि माझी जीवनशैली आहे”.

या कार्यक्रमात ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहर अध्यक्ष राग़ेब अलीम, जिल्हा शहर अध्यक्ष फहद अहमद, चिटणीस मानव सेवा शकील अहमद, मक़बूल अहमद प्रचारक अहमदिया मुस्लिम जमाअत, तसेच अब्दुल क़य्युम नासीर, नदीम अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद , शफीक अहमद,अब्दुल लतीफ ,अब्दुस समद, अब्दुल अलीम,अब्दुल नईम व इतर अन्सार सदस्य यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!