Spread the love

उस्मानाबाद ( श्रीकांत मटकीवाले ) – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देऊन पोलीस पाटलांचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावे, अशी मागणी तुळजापूर मतदार संघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे करण्यात आली. राज्यातील पोलीस पाटलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मानधन वाढ करणे, शस्त्र परवाना देणे, नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 करणे आदी मागण्याचा समावेश आहे. 22 डिसेंबर रोजी नागपूर येथे गावकामगार पोलिस पाटील संघाच्या होणाऱ्या मोर्चास पाठिंबा देण्याबाबत व अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून पोलिस पाटलांच्या मागण्या करण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून निवेदन दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष हनुमंत देवकते पाटील, मरावाडा कार्यकारी अध्यक्ष राहुल वाकुरे पाटील, मिडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम पाटील, सचिन जाधव पाटील, सुनिल अंधारे पाटील, मगर पाटील, संदिप देशमुख आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!