Spread the love

उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले) उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक वारसा जपणारा जिल्हा होय, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, प्राचीन वास्तुचे माहिती व जतन होण्याकरिता पर्यटन विकास समितीच्या वतीने आम्ही अनेक वर्षांपासून काम करीत आहोत. उस्मानाबाद येथील हातलाई – धाराशिव लेणी परिसर निसर्गरम्य असुन या निसर्गरम्य परिसरात हातलाई तलावामध्ये संगीत कारंजे, बोटिंग व रोप वे ची सुरुवात करावी अशी आमची मागणी असून त्यासाठी सातत्याने पर्यटन विकास समिती पाठपुरावा करत आहे.त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मार्फत डीपीडीसी मधून रुपये 72.26 लक्ष निधी प्राप्त करून तलावांमध्ये संगीत कारंजाचे स्ट्रक्चर, हायमस्ट पोल, बसविण्यात आलेले आहेत मात्र विद्युत कनेक्शन अभावी सदरील संगीत कारंजे अद्याप ही सुरु होऊ शकलेले नाही.आम्ही जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात चौकशी केली असता डी पी व विद्युत कनेक्शनसाठी लागणाऱ्या रुपये 22 लक्ष निधीची तरतूद होणे संदर्भात जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्राद्वारे मागणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. आपण याविषयी सकारात्मक भुमिका घेऊन लवकरात लवकर निधीची तरतुद करून दिल्यास हातलाई तलावातील संगीत कारंजे लवकरात लवकर चालु होऊ शकेल व पर्यटनाचे एक आकर्षक केंद्र तयार होऊ शकेल,ज्याचा लाभ उस्मानाबाद सह बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे.तुळजापूर पर्यंत येणारे लाखो पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी उस्मानाबाद पर्यंत येऊ शकतील व एकंदरीतच जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देऊ शकतील आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतील.
आपण व्यक्तिशः लक्ष घालुन निधीची तरतुद करुन सदरील काम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना समक्ष भेटून सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नियोजन समिती अधिकारी अनिल झाडे यांच्याशी संपर्क साधून लवकरच डि पी व विद्युत कनेक्शनची व्यवस्था करुन हातलाई तलावातील संगित कारंजे चालू करु असे म्हणाले.निवेदन देतांना अध्यक्ष युवराज नळे,सचिव देविदास पाठक,रणजित रणदिवे,डॉ.अभय शहापूरकर,अब्दुल लतीफ,अभिमान हंगरकर, गणेश वाघमारे,बाबासाहेब गुळीग,धर्मवीर कदम सह पर्यटन विकास समिती सदस्य इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!