Spread the love

उस्मानाबाद (प्रतिनिधि) दिनांक 12 जानेवरी 2023 रोजी,सकाळी अकरा वाजता, उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका सचिव युनूस पटेल यांचा हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेची पुष्प,दीप धुपाने पूजन करुन कार्यक्रमाची शुरुआत करण्यात आली.तसेच या मंगल प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,अॅड.प्रबुध्द कांबळे, भीम निर्णायकचे सचिन दिलपाक,वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सचिव सोमनाथ नागनाथ यांनी राजमाता जिजाऊ यांच्या राजकीय कार्यशैलीव प्रकाश टिकत अभिवादनात्मक मार्गदर्शन केले.त्याच बरोबर या क्रांतीकारी प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष करून उपस्थितांना मिठाईचे वाटप केले.या अभिवादन कार्यक्रमास शिवाजी शिंदे,बाबासाहेब कांबळे,मुकेश मोटे,विनायक गायकवाड,डाॅ.राजू गायकवाड,राजाभाऊ गायकवाड,नामदेव वाघमारे,हिम्मत शिंगाडे, भीमसेन माने,प्रभाकर सोनवणे,निलेश ओव्हाळ,अतुल लष्करे,डि.एस.पी चे जि.प्रतिनिधी श्रीकांत मटकीवाले प्रमुख उपस्थिती.तर अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावणा जागृती फौंडेशनचे अध्यक्ष विजय अशोक बनसोडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!