Spread the love

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) – भारतीय जन विकास मंच महाराष्ट्र राज्यातर्फे दिला जाणारा मराठवाडा भुषण पुरस्कार कर्तृत्ववान माजी नगरसेवक तथा डिपिडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे यांना माता जिजाऊ व युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रशांत भालशंकर सर,आदर्श ग्रामसेवक केवळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ बुके असे होते,कार्यक्रमाच्या प्रथम माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन करण्यात आले.सिध्दार्थ बनसोडे यांनी नगर सेवक म्हणून जनतेची कामे केली, रमाई आवास योजना यशस्वीपणे राबवित लाभार्थ्यांना स्लॅबच्या घरात राहण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे यशस्वी कार्य केले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या जागेत फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत बाबी पुर्ण करण्यासाठी डिपीडिसी च्या बैठकीत ठामपणे भुमिका घेतली तर कोरोना काळात गरजवंताला अन्नधान्य किट,शक्तीवर्धक औषधे,पाणी पुरवठा केला,आधार कार्ड,श्रम कार्ड कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचा मेळावा अशा अनेक जनहितार्थ कार्य त्यांनी केले असुन सध्याही त्यांचे कार्य चालु आहे.गरज राहिल वास्तवतेची अशा या कर्तृत्ववान माजी नगरसेवक तथा डिपिडिसी सदस्य सिध्दार्थ बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय जन विकास मंचाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते प्रविण भालशंकर सर,शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष धनंजय राऊत, राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प चळवळीचे गणेश रानबा वाघमारे, असंघटित बांधकाम कामगार संघटना काॅग्रेस कमेटी सरचिटणीस संजय गजधने, पत्रकार श्रीकांत मटकिवाले, बळीराजा पार्टिचे तर भारतीय जन विकास मंचचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ रमेश बनसोडे,जिल्हाध्यक्ष जनार्धन वाळवे अन्य इतर उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना प्रविण भालशंकर यांनी केली तर आभार डॉ रमेश बनसोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!