Spread the love

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच घेतली जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव

कळंब – डिकसळ ( राहुल हौसलमल) अंगणवाडीत पुरवठा करण्यात येणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच आरोग्यास अपायकारक असल्याची तक्रार तालुक्यातील डिकसळ येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने डिकसळ पोषण आहार प्रकरण पुन्हा चर्चेत आलेय. काही महिन्यांपूर्वीही याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने आता खुद्द अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच तक्रार नोंदविल्याचे समोर येतेय.डिकसळ येथील आठ अंगणवाडी कार्यकर्तींनी ही तक्रार दिली आहे. या भागातील अंगणवाडीमध्ये २०२१ पासून एका स्वयंसेवी महिला बचत गटाकडे बालकांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याचे काम वरिष्ठ कार्यालयाने सोपविले होते. परंतु हा घरपोच पोषण आहार देण्याचे काम सुरू झाल्यापासूनच निकृष्टतेबाबत तक्रारी होत होत्या. आहार पुरवठ्यात अनियमितता असल्याने पालकवर्ग तो आहार स्वीकारण्यास उदासीनता दाखवत असल्याचेही समोर येत होते.निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मागील महिन्यातच पोषण आहार पुरवठा करणाऱ्या डिकसळसह आणखी काही ठिकाणच्या पुरवठादारांच्या चौकशीच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्याबाबत चौकशी चालू आहे.

■ त्याचा एकत्रित अहवाल तहसीलदार यांच्याशी चर्चा करून आठ दिवसांत वरिष्ठ कार्यालयात कार्यवाहीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी अनिल कांबळे यांनी दिली.याबाबत काही पालकांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. वारंवार लेखी तक्रारी वरिष्ठ कार्यालयांना अधिकाऱ्यांना देऊनसुद्धा यात कसलच बदल झाला नाही. संबंधित महिला बचत गटाच्या पदाधिकारी महिलेला भेटून पुरवठा करण्यात येत असलेला निकृष्ट असून, मुबलक, स्वच्छ आणि ताजा आहाराचा पुरवठा करण्यास सुचविले. त्यावर संबंधित महिला पदाधिकारी यांनी होते.आम्हा सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना धमकावले तसेच राजकीय कार्यकत्यांचा दबावतंत्राचा बेकायदेशीर वापर करून आमच्या शालेय कर्तव्यात वारंवार अडथळा निर्माण करत आहे, असा गंभीर आरोपही तक्रारीत केलाय. अंगणवाडीमध्ये स्वच्छ, ताजा पोषण आहार पुरवठा करावा अन्यथा २५ जानेवारीपासून कामबंद आंदोलन करू, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी पंचशील किरण मस्के, मीरा भास्कर लिमकर, आशा अनिल जाधव, सना दामोदर आडसूळ, रेखा राजाभाऊ वाघमारे, भाग्यश्री रमेशराव दीक्षित, बेबी आयशा जावेद शेख, मंगल शांतशील गायकवाड आदी उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!