
लातूर ( दीपक पाटील ) लहान भावाला मोठ्या भावाचा खून करण्याची परिस्थिती का उद्भवली? तर या मागचे कारणीभूत मदिरा ( दारू ) ज्यामध्ये वाहत गेलेला मोठा भाऊ, वडिलाला पॅरलेसस व एक बहीण तीही अपंग त्यातल्या त्यात आई म्हणजे साधी भोळी भाबडी . त्यामध्ये परिवाराचा गाडा व त्यांची उपजीविका भागवण्याची सर्वस्व जबाबदारी मोठ्या मुलाची असताना, त्यांची संपूर्ण जबाबदारी लहान मुलगा चालवत होता. परंतु मोठ्या भावाचं दारुचे वेसन,व वडिलांची अवस्था त्यातल्या त्यात बहीण अपंग व आई एकदम भोळी भाबडी त्यात टोकाचे पाऊल उचलणारा तो लहान भाऊ ज्याने सख्या भावाचा डोक्यात गोळी घालुन खुन करून त्याच्या साथीदारास अटक करुन गुन्हयात वापरलेले गावठी बनावटीचा कट्टा व गुन्हयात वापरलेले वाहन जप्त करुन खुनाच्या गुन्हयाची उकल करण्यात आली. दिनांक 07.02.2023 रोजी पोलीस स्टेशन लातूर ग्रामिण हद्दीत मौजे भातखेडा येथील पोलीस पाटील श्री महादेव मारोती भालेराव यांनी कळविलेकी भातखेडा येथील इसम नामे सुरज गोविंद मुळे वय 25 वर्षे हा मयत झाला आहे. व त्याचे डोक्यास मार आहे असे कळविले वरून सपोनि श्रीमती प्रतिभा ठाकूर व पोलीस स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी ”भातखेडा गावी जाउन वरील घटनेची खात्री करून कार्यवाही करणे कामी रवाना झाले होते.वरील बातमीची शहानिशा केली असता मयत सुरज मुळे याचे डोक्यात जखम दिसून आल्याने व मयताचे वडील श्री. गोविंद रामकृष्ण मुळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन लातूर ग्रामिण येथे गू. र. न. 07/2023 सीआरपीसी 174 प्रामणे दाखल करून प्राथमिक तपास सपोनि श्रीमती ठाकूर हे करीत असतांना त्यांनी मयत सुरज मुळे याचे मरणाचे निश्चित कारण समजण्या साठी सरकारी दवाखाना लातूर येथे मरणोत्तर पंचनामा करून शवविच्छेदना करीता वैदयकिय अधिकारी यांना विनंती केली. शविवच्छेदना दरम्यान मयत सुरज मुळे यास कोणत्यातरी अग्निशस्त्राचा वापर करून त्याचे डोक्यात गोळी मारल्याने तो मरण पावला असा शवविच्छेदन करणारे वैदयकिय अधिकारी शासकीय महाविद्यालय लातुर यांनी अहवाल दिल्याने प्राथमिक तपास अधिकारी सपोनी ठाकूर यांनी मयत सुरज मुळे याचे डोक्यात कपाळाचे वर उजवे बाजूस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डोक्यात अग्निशस्त्राने गोळी मारून मयत सुरज याचा खुन केला आहे अशी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने पो. स्टे. लातूर ग्रामिण येथे गु.र.न. 46/2023 कलम 302 भादवी सह कलम 3.25 आर्म ऍक्ट व सह कलम 135 म.पो.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस अधिक्षक लातूर, मा.डॉ.श्री. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक लातूर, तसेच मा.श्री. सुनिल गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग लातूर ग्रामिण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. दिपककुमार वाघमारे पोलीस निरीक्षक पो.स्टे लातूर ग्रामिण हे सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना व गुन्हातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वरील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शणाखाली विविध पोलीस शोध पथके तयार करून तपास कामी रवाना केले व गुप्तबातमीदार नेमूण त्यांना सुचना देवुन गुप्तमाहीती काढणे बाबत रवाना केले. दरम्यान गुप्तबातमीदारांकडुन माहीती मिळाली कि, गुन्हातील मयत सुरज गोविंद मुळे व त्याचा भाऊ धिरज गोविंद मुळे यांचेत सतत घरगूती कारणावरून वाद व भांडणे होत होती व तसेच मयत सुरज यास धिरज याने जिवे मारण्याची धमकी दिलेली होती तसेच मयत सुरज नेहमी दारू पिउन आई वडीलांना व अपंग बहीणीला व आरोपी धिरज मुळे यांना सतत मारहाण करीत होता त्याचे त्रासाला कंटाळून धिरज हा आई भहीणीला घेवून पुणे येथे कामासाठी निघून गेला होता. त्यामुळे धिरज मुळे याचे मनात मयत भाउ सुरज याचे बाबतीत प्रचंड राग व चिड निर्माण झालेली होती अशी गोपनीय माहीती मिळाली होती.त्या वरून वर नमुद गुन्हयातील संशयीत आरोपी धिरज गोविंद मुळे यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सांगीतले कि, आरोपी धिरज गोविंद मुळे व त्याचे इतर कुटुंबीयांना मयत सुरज मुळे हा सतत दारु पिवुन त्रास देवुन मारहाण करीत असल्यामुळे व ते आरोपी धिरज मुळे याला सहन होत नसल्याने त्याने भाऊ सुरज याला

होती तसेच मयत सुरज नेहमी दारु पिउन आई
वडीलांना व अपंग बहीणीला व आरोपी धिरज
मुळे यांना सतत मारहाण करीत होता त्याचे
त्रासाला कंटाळून धिरज हा आई भहीणीला
घेवून पुणे येथे कामासाठी निघून गेला होता.
त्यामुळे धिरज मुळे याचे मनात मयत भाऊ
सुरज याचे बाबतीत प्रचंड राग व चिड निर्माण
झालेली होती अशी गोपनीय माहीती मिळाली
होती. त्या वरून वर नमुद गुन्हयातील संशयीत
आरोपी धिरज गोविंद मुळे यास ताब्यात घेवून
त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने
सांगीतले कि, आरोपी धिरज गोविंद मुळे
त्याचे इतर कुटुंबीयांना मयत सुरज मुळे हा
सतत दारु पिवुन त्रास देवुन मारहाण करीत
असल्यामुळे व ते आरोपी धिरज मुळे याला
सहन होत नसल्याने त्याने भाउ सुरज याला
जिवानीशी ठार मारण्याचे निश्चीत करुन दि.
07.02.2023 रोजी पहाटे 03.00 ते 03.30
वा सुमारास धिरज हा त्याचा मित्र अमर अशोक
गायकवाड रा भातखेडा यास लातुर येथुन
अमर याची मोटार सायकल घेवुन नमुद दोघे हि
भातखेडा गावी सुरज राहत असलेल्या घरी
जावुन आरोपी अमर गायकवाड यास घराबाहेर
रेखी करण्यासाठी सांगुन स्वत धिरज मुळे हा
घरामध्ये जावुन भाऊ सुरज मुळे हा झोपेत
व
असतांना त्याचेवर धिरज कडे असलेल्या
गावठी पिस्तुलातुन त्याचे डोक्यात गोळी
झाडुन खुन करुन दोन्ही आरोपी त्याच मोटार
सायकलवर लातुर येथे परत आले व आरोपी
धिरज मुळे हा पुणे येथे निघुन गेल्याचे तपासात
निष्पन्न झाले. एकंदरीत वरील तपासादरम्यान
असेही निष्पन्न झाले कि, आरोपी धिरज मुळे हा
पुणे येथे एका खाजगी सुरक्षा एजन्सी मध्ये
सुरक्षा रक्षक म्हणुन काम करत होता व
स्वताचे लग्न जमविण्याठी गावी भातखेडा येथे
जायचे आहे असे खोटे सांगुन रजा घेवुन
रात्रीतुन पुणे येथुन लातुर येथे येवुन व त्याचा
मित्र अमर गायकवाड यास सोबत घेवुन दोघेही
भातखेडा येथे जावुन अमर यास रेखी
करण्यासाठी सांगुन स्वता धिरज याने स्वताचे
सख्खा भाऊ सुरज याचेवर गोळी झाडुन त्याचा
खुन करुन गुन्हयात वापरलेले गावठी पिस्तुल
हे पुणे येथे त्याचे मित्राचे घरी लपवुन ठेवल्याचे
निष्पन्न झाल्याने सदरचे गावठी पिस्तुल पुणे
येथुन जप्त करण्यात आले व गुन्हयात
वापरलेली मोटार सायकल आरोपी अमर
गायकवाड याचेकडुन भातखेडा येथुन जप्त
करण्यात आले आहे. सदरचा गुन्हा उघडकीस
आणण्यासाठी मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस
अधिक्षक लातूर, मा. डॉ. श्री. अजय देवरे,
अप्पर पोलीस अधिक्षक लातूर, तसेच मा. श्री.
सुनिल गोसावी, उप विभागीय पोलीस
अधिकारी उप विभाग लातूर ग्रामिण पोलीस
निरीक्षक गजानन भातलवंडे स्थागुशा लातुर
यांनी वेळोवेळी मार्गदशर्न करुन व
तपासाबाबत योग्य त्या सुचना देवुन स्थानिक गुन्हे शाखा
अधिकारी श्री. गजानन भातलवंडे व दिपककुमार वाघमारे पोलीस निरीक्षक पो. स्टे लातूर यांच्या नेतृत्वात ग्रामिण सपोनि श्रीमती प्रतिभा ठाकुर, पोउपनि श्री तानाजी पाटील,पोलीस अंमलदार विष्णु चौगुले, सतिष लामतुरे, सचिन चंद्रपाटले, राहुल दरोडे,नितीन पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे रवि गोंदकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे यांनी गुन्हा दाखल झालेपासुन 24 तासाचे
आत आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस
आणुन वरील आरोपीतांना अटक केली आहे.