उस्मानाबाद :- ( श्रीकांत मटकिवाले)उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) फेब्रुवारी/ मार्च -2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी फेब्रुवारी /मार्च 2023 दि. 21/2/2023 ते दि. 21/3/2023 या कालावधीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रावर घेतल्या जाणार असून सदर परीक्षेसाठी विद्यार्थी एकूण संख्या 15901 इतकी असून जिल्ह्यातील परिरक्षक कार्यालय संख्या 11,परीक्षा केंद्रे 40 तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)फेब्रुवारी/ मार्च 2023 अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक 2/3/2023 या कालावधीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 86 परीक्षा केंद्रावर घेतले जाणार असून सदर परीक्षेसाठी तालुका निहाय पर्यरक्षक कार्यालय परीक्षा केंद्र व परीक्षेत बसलेली विद्यार्थी संख्या एकूण 21983 असून परीरक्षक कार्यालये एकूण 12,परिक्षा केंद्रे 86 असे आहे. प्रस्तुत परीक्षांचे सार्वजनिक महत्त्व अनन्य साधारण स्थान जाणून परीक्षा आयोजनातील गोपनियता आणि परीक्षा केंद्राच्या परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे,परीक्षा सुरळीत व कॉफी मुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशिक्षणाद्वारे उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.जिल्ह्यामध्ये कॉफी मुक्त अभियान राबविण्यासाठी दक्षता समितीद्वारे नियोजन करण्यात आले आहे. यात परीक्षा चालू असताना दक्षता समिती सदस्यमार्फत परीक्षा केंद्रांना आकस्मित भेटी देण्यात येणार आहेत,
परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात पोलीस अधिनियम 1973 कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाह्य उपद्रव होणार नाही या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
परीक्षेच्या दरम्यान बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करू नये, परीक्षा केंद्राच्या परीघीय भागामध्ये बंदोबस्ताचे काम करावे अशा सूचना पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.
परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षा दालनात पर्यवेक्षण करण्यासाठी त्याचा शाळेच्या/ विद्यालयाच्या शिक्षकांना नियुक्त न करता इतर शाळेच्या विद्यालयाच्या शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आलेले आहेत.
भरारी पथकाची स्थापना
परीक्षेचे सनियंत्रण करणे, परीक्षेचे दरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी शिक्षणाधिकारी( माध्यमिक) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या कार्यालयात जिल्हास्तरीय दक्षता कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे .सदर जिल्हास्तरीय दक्षता कक्षाचे कामकाज करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी (शिक्षण) व शिक्षक यांना नियुक्त करण्यात आलेले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 13 परिरक्षक कार्यालये स्थापन करण्यात आलेले आहेत.सदर पर्यरक्षक कार्यालयाच्या ठिकाणी गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवावे लागते.या कार्यालयामार्फत परीक्षा केंद्रंना प्रश्नपत्रिका वितरित करणे व परीक्षा केंद्रावरून उत्तर पत्रिका संकलित केल्या जातात तसेच ग्रामीण भागात सर्व गोपनीय साहित्य पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात येते. यासाठी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
महसूल विभागाची बैठे पथके
महत्त्वाच्या विषयाच्या पेपर दिवशी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख वर्ग एक व वर्ग दोन अधिकारी हे कॉफी मुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्रावर बैठे पथक म्हणून भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर सर्व बैठे पथक प्रमुख अधिकारी याची 16/2/2023 रोजी मा. जिल्हाधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. जिल्हा पोलीस अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेण्यात आलेली असून कॉफीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेल्यावर कोणकोणत्या उपाय योजना करण्यात याव्या याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत.
कॉफी मुक्त अभियान राबविण्यासाठी मा. जिल्हाधिकारी महोदय यांना जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तसेच शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांना समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.
कॉफी मुक्त अभियान राबविण्यासाठी मा. जिल्हाधिकारी,मा.पोलीस अधीक्षक व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम करत आहेत.
कॉफी मुक्त अभियानासाठी जनजागृती मोहीम राबविणे
कॉफी मुक्त अभियानाबाबत विद्यार्थी पालक शिक्षक व संस्थाचालक यांचे उद्बोधन, जनजागृती व वातावरण निर्मिती व्हावी यासाठी दिनांक 16/2/2023 रोजी पर्यरक्षक/संस्था चालक/ प्राचार्य/मुख्याध्यापक/केंद्र संचालक यांची हातलाई मंगल कार्यालय उस्मानाबाद येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत मा.शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी उपस्थित शिक्षक/ मुख्याध्यापक/संस्था चालक यांना परीक्षेचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परीक्षा सुरळीत व कॉफी मुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी आवश्यक मार्गदर्शन केलेले आहे.
परिक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करणे बाबत प्राचार्य/ मुख्याध्यापक/ संस्था चालकांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परिसरातील 50 मीटरच्या आतील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांची झाडाझडती
100% विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र परीक्षावेळी झडती घेणे बाबत केंद्र संचालक/प्राचार्य/ मुख्याध्यापक यांना निर्देश दिलेले आहेत,पोलीस पाटील,कोतवाल,शाळेच्या कर्मचाऱ्याकडून मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या कडून मुलीची तपासणी करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉफी मुक्त परीक्षा देऊन पुढील शिक्षण चांगल्या रीतीने घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.