सोलापुरात आजोबांकडूंन अल्पवयीन नातीवर बलात्कार

सोलापूर (संभाजी पुरीगोसावी) करमाळा तालुक्यांतील पश्चिम भागांतील एका गावात ६५ वर्षीय आजोबांनी आपल्याच नातीवर घरात कोणी नसताना जबरदस्तीने बलात्कार केल्यांची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे करमाळा तालुक्यांत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यांने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आजोबांनी आपल्याच सख्ख्या चुलत भावाच्या एका अल्पवयीन नातीवर घरात एकटे असताना उन्हाळ्यांच्या सुट्टीमध्ये जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला आहे त्यानंतर घरात आई-वडिलांना सांगू नकोस नाहीतर जीवे मारण्याची धमकी देखील आजोबांनी दिली. त्यामुळे नातीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितलाच नाही. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्यांने तिच्या आईला आलेल्या संशयावरुन पीडित मुलीला विश्वासांत घेवुन तिने अखेर आजोबांनी अनेकवेळा बलात्कार केल्याचे सांगितले यावेळी मुलीच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन करमाळा पोलिसांनी आरोपी आजोबाला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे सध्या सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही कामगिरी करमाळा पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे तसेच पो. उनि.सागर कुंजीर पो. हवा. संतोष देवकर मेजर आनंद पवार आदीं पोलिसांनी या कारवाई सहभाग घेतला.