
किनगाव (प्रतिनिधी) तक्रारदार लक्ष्मण राजाराम पाटील वय 54 वर्षे, व्यवसाय नौकरी रा.चामे गार्डन समोर अहमदपूर,
यांनी किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून साखर कारखान्याशी केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयातर्फे साखर कारखान्यासाठी अनुदान मदत या योजनेअंतर्गत केलेल्या करारानुसार साखर कारखान्याची 2607 मेट्रिक टन साखर आरोपींनी खरेदी करून निर्यात करण्यासाठी कुरिंजी प्रो नॅचरल प्रायव्हेट यांचे मार्फत साखर निर्यात करण्यासाठी चेन्नई येथील कुरुंजी प्रो. अग्रो नॅचरल प्रा. लि. या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. कंपनीने साखर उचलली. मात्र, निर्यात केलेले दस्तावेज मागणी करूनही दिले नाहीत. सदर साखर कारखान्यास केंद्र सरकारकडून मिळणारे मदत अनुदान 2,72,43,150 रू. चे नुकसान करून फिर्यादी व केंद्र शासनाची फसवणूक करून मालाची व मिळणाऱ्या अनुदानाचे अपहार केले त्यामुळे कंपनीचे कार्यकारी संचालक चंद्राबाबू प्रदीपराज, प्रदीप कलादास गायत्री संचालक,अभिजित देशमुख रा.शिर्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस.जाधव करीत आहेत.
