
किनगाव ( दिपक पाटील) : जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीसांच्या पथकाने बेकायदेशीररित्या कल्याण मिलन डे नावाचा जुगार खेळवणाऱ्याना रंगेहाथ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाला बेकायदेशीररित्या जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन किनगाव पो.ठा. च्या हद्दीतील गोढाळा ता. रेणापूर येथे दि. 4 सप्टेंबर 20121 रोजी छापे मारले. कारवाईमध्ये निळकंठ लिंबाजी केंद्रे,वय 36 वर्षे रा. गोढाळा ता. रेणापूर जिल्हा लातूर हा कल्याण मिलन डे नावाचा जुगार स्वतःच्या फायद्यासाठी खेळवत असताना पंचासमक्ष पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून जुगार साहित्य, विवो कंपनीचा काळसर मोबाईल अंदाजे किंमत ₹15000/- व रोख ₹9370/- रुपये रक्कम बाळगलेले पथकास आढळले.आरोपी नामे निळकंठ लिंबाजी केंद्रे यास कल्याण मिलन डे नावाचा मटका जुगार घेऊन कोणाला देतो व बुकी मालक कोण आहे असे विचारले असता त्यानी असे सांगितले की, बुकी मालक हे गोविंद फड, वय अंदाजे 40 वर्षे,रा. धर्मापुरी ता. अंबाजोगाई जि. बीड हे असून मी त्यांना त्यांच्या मोबाईलवर खेळ पाठवतो व ते आम्हांला 10% नुसार कमिशन देतात असे सांगितले. आरोपी नामे निळकंठ केंद्रे याने कल्याण मिलन डे नावाचा मटका जुगाराच्या आकडयाचे फोटो त्याच्या मोबाईलमधून व्हाट्सअँप द्वारे गोविंद शेट व कल्याण या नावाने असलेल्या क्रमांकावर पाठवलेल्या आढळून आल्या. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथक पोह लक्ष्मीकांत देशमुख,पोना केशव जायभाये, पोना रमेश चौधरी, पोशि गणेश खंदाडे, चापोना शेंडगे यांच्या पथकाने कामगिरी बजावली. सदरील कारवाईने किनगाव परिसरातील अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत
