
सोलापुर { प्रतिनिधी } :- लग्नात मान पान केला नाही नवीन गाडी घेण्यासाठी वडिलाकडून पाच लाख रुपये घेऊन ये, अन्यथा सोड चिट्ठी दे असे म्हणत , विवाहितेचा खेळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती मयूर मधुकर कोरे सासरे मधुकर प्रल्हाद कोरे सासू महादेव मधुकर कोरे हे सर्व राहणार रेनापुर तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथील असून ननंद मेघा विनोद दोडमनी राहणार नाना पेठ पुणे नेहा निखिल कबूतरे राहणार चिखली जिल्हा बुलढाणा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे सारिका मधुकर कोरे वरती 23 राहणार पहिला मजला सुवर्णकार अपार्टमेंट गडगी नगर जुना विडी घरकुल सोलापूर हिचा विवाह लन विष्णुदास मंगल कार्यालय, नवीन रेणापूर नाका, साई चौक, लातूर येथील मयूर मधुकर कोरे रा. मु.पो. रेणापूर ता. रेणापूर जि. लातूर यांचेशी हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह झालेला आहे. लग्नामध्ये मुलीच्या वडिलांनी मयुर कोरे यांना स्वीधन म्हणून 09 तोळे सोने व कपडयाकरीता, संसारउपयोगी साहित्याकरीता रु.51,000/- दिलेले होता. विवाह झाल्यापासून आजतागायत पर्यंत सर्वजण सारिका चा सर्वा समोर अपमानित करत घरांमध्ये मोलकरीन सारखी वागनुक दिली आहे शारीरिक मानसिक छळ केला आहे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सारिकाच्या घरच्यांकडून करण्यात येत आहे.
