Spread the love

गातेगाव :- { दिपक पाटील } पोळ्याची करीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी चिंचोली [ब] व काटगाव शिवारातील विविध ठिकाणी छापे मारून देशी व विदेशी दारू सह हातभट्टी केली जप्त. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आल्या आहेत.
गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीत करत असलेल्ये देशी व विदेशी दारूसह हातभट्टी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी छापा मारला असता एक जण रहात्या घरीच दारू विक्री करताना आढळला. {१} विष्णु नामदेव भडंगे वय ४५, रा. चिंचोली (ब) ता.जी. लातूर असे पकडलेल्या दारू विक्रेत्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून २८८० रुपये किमतीच्या ४८ देशी संञा दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.{२} हाॅटेल श्रुती येथे दारू विक्री करणारा माणिक तायप्पा कोकणे वय ४३ , रा. चिंचोली (ब) , ता.जी. लातूर याला पोलिसांनी दारू विकताना पकडले. त्याच्या ताब्यातून ७ हजार ७३० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली. {३} येळी पाटी येथे हाॅटेल ग्रीनपार्क श्रीराम साहेबराव दुटाळ वय ४३, रा. चिंचोली {ब} याला देशी दारू विकताना पकडून त्याच्या ताब्यातून १४७० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. व {४} हातभट्टी विकणाऱ्या वसंतनगर तांडा येथील उत्तम टिकाराम चव्हाण यांच्या कडून गावठी दारू १८ लिटर किंमत १८०० रुपये {५} मांजरी ते येर्ळी रोडवरील पञ्याच्या शेडवरील सखाराम मारूती माणे वय ४० रा.दत्तनगर मुरुड यांच्या कडून १५ लीटर गावठी दारू किंमत १५०० रुपये जप्त करण्यात आला, या सर्व आरोपीवर गातेगाव पोलिस ठाण्यात ६५ ई प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे , या कार्यवाह्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे यांच्या मार्गदर्शनात पो.हे.हिंगमीरे, पो.हे. गिरी, पो.हे. डापकर, पो.ना. एडके, पो.ना.शिरीष पाटील, चालक मोरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!