Spread the love

वाढवणा :- { दिपक पाटील } दिनांक ०३~०९~२१ रोजी सकाळी १० ते १ च्या सुमारास डोंगरशेळकी ता.उदगीर जि.लातूर येथील रावसाहेब विठ्ठल मुंडे व वैजनाथ तुळशीराम पारित यांचे घराचे कुलूप तोडून मुंडे यांच्या घरातील कपाटाचे लाॅकर खोलून आत ठेवलेले सोन्याची पोत ,गंठण,टाॅप्स,चांदीचे कडे, वाळे,व रोख रक्कम १७००० रूपये असा तब्बल दोन लाख पन्नास हजार आठशे रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा करत असता शेजारील लोकांना चाहूल लागल्यावर चोर चोर अशी आरोळी कानावर पडताच सदरील चोराने त्याच्या ताब्यातली मोटरसायकल तेथेच टाकून पळून गेला . चोरीची लेखी फिर्याद मुंडे यांनी वाढवणा पोलिस ठाण्यात वरील मालासह दिली,गु.र.नं.१५५/२०२१ कलम ४५४,३८० भादवि प्रमाणे दाखल होताच, नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी आपली कामाची कसोटी पणाला लावत घटना घडलेल्या दुसर्‍याच दिवशी दिनांक ०४ ~०९~२१आरोपी संदीप ञंबक पूंडे वय २२ वर्ष रा. जांब ता.मुखेड जि.नांदेड यास ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपीला अटक करण्यात आले.या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण सह पोलीस ठाण्याचे साळूंखे, घोरपडे, कसबे,बोईनवाड यांनी कामगिरी बजावली, या यशाबद्दल गावातील जनतेकडून शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!