कंधार ( भिमराव कांबळे) दि.15/09/21रोजी बुधवार मौ.ग. ऊळ ता.कंधार येथील मातंग समाजावर अमानुष लाठीचार्ज ची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात करण्यात यावी. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा हटवलेला पुतळा सन्मानाने बसवण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करणे तसेच मातंग समाजाच्या तरुणावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याबाबत मातंग समाज व विविध संघटनेकडून निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडी नांदेड चे जिल्हाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड अहमदनगर चे जिल्हाध्यक्ष श्री. टिळक बोस, बसव ब्रिगेड चे नेते सचिन पेटकर,तसेच प्रितम गवाले ( लहुजी सेना ) दिपकभाऊ वाघमारे, शिवराज दाडेल, ई. नेते उपसथितांसमोर बोलले.