
1)आरोपी नामे नागेश नारायण दूरनाळे रा. जाम बुद्रुक याचे घरून 3,26,700/- रु. गोवा,सितार व राजनिवास नावाचा गुटखा एकूण 63 पोते जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध पोस्टे मुखेड गुन्हा रजिस्टर क्रमांक 278/21 कलम 188, 272, 273, 328 भा द वि सह 59 अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 2) आरोपी नामे रामराव नागनाथ शिंदे रा. जाम बुद्रुक याचे घरून 11,85,800/- रु चा नजर व आरजे नावाचा गुटखा एकूण 210 पोते जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध पो स्टे मुखेड गुन्हा रजिस्टर क्रमांक 279 /21 कलम 188, 272, 273, 328 भा द वि सह 59 अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे , उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सचिन सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे पोलीस उपनिरीक्षक गजानन आनसपुरे पोलिस जमादार आत्माराम काम जळके पोलीस नामदार ज्ञानेश्वर ठाकूर, सिद्धार्थ वाघमारे, मारुती मेकले वाड, दोसलवार, शिवाजी आडबे, बालाजी दांतपले, योगेश कोकणे यांचे पथकाने केली.
