Spread the love

लातूर :- { प्रतिनिधी } पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपाधीक्षक श्रीमती प्रिया पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी औसा रोड परिसरात त्याने चोरलेली मोटरसायकल विकण्याच्या प्रयत्नात परिसरात फिरत आहे.अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने औसा रोड सापळा लावला.माहितीप्रमाणे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे-
1) पवन अशोक काळे, वय 24 वर्ष, राहणार- म्हाडा कॉलनी, महाराणा प्रताप नगर ,लातूर.यास पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यान त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्या असून त्यापैकी 01मोटारसायकल माझ्या घरासमोर लावलेली आहे व दुसरी मोटरसायकल सध्या माझ्या ताब्यात आहे असे असे सांगितल्याने सदरच्या मोटरसायकली जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मोटर सायकलची माहिती खालील प्रमाणे.

1) TVS Jupiter (light Grey colour)
Chasers number
MD6264481996463
Engine number
EG4G1747421

2) Passion Pro (black colour)
Chasis number
MBlGA12909061
Engine number
JA129F01011

3) Oppo company mobile IMEI number
8695777044072137
869577044072129

      असा एकूण 85,000/- हजार रुपयांचा मुद्देमाल एकूण 2 मोटारसायकली, व एक मोबाईल जप्त करण्यात आले असून सदर चोरीच्या मोटार सायकलची पडताळणी केली असता पोलीस ठाणे शिवाजी नगर, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 362/2021 कलम 379 भादवी. प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने जप्त मोटारसायकली व आरोपी नामे पवन अशोक काळे  यास पुढील कार्यवाही व तपास करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचेकडे देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.
         सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे पोलीस उप अधीक्षक श्रीमती प्रिया पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय भोसले, पोलीस अंमलदार- प्रमोद तरडे, योगेश गायकवाड ,भोंग यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!