
शिरूर अनंतपाळ :- ( प्रतिनिधी) : – तालुक्यातील साकोळ येथे दोन ठिकाणी अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बब्रुवान तपघाले व पोलीस कॉन्स्टेबल संदीप तिपराळे यांनी छापा टाकला आहे . या कारवाईत पोलिसांनी अवैध दारूच्या ३१ बाटल्या जप्त केले आहेत . याबाबत दोन आरोपीवर शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत अधिक माहिती अशी कि, साकोळ येथे तिपराळ जाणाऱ्या रोडवर पानटपरी मध्ये अवैध पद्धतीने दारूविक्री होत असल्याची व अन्य दुसऱ्या ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती शिरूर अनंतपाळ पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल बब्रुवान तपघाले व पोलीस कॉन्स्टेबल संदीप तिपराळे यांनी पोलीस निरीक्षक अगंद सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दोन ठिकाणी छापा टाकला असता तेथे १८६० रूपयांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत .
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल बब्रुवान तपघाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपीवर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बब्रुवान तपघाले करीत आहेत .
