Spread the love

गातेगाव :-{ दिपक पाटील } अवैध दारू विक्री आणि हातभट्टी व मटका विरोधात पोलीस अधीक्षक पथक विभाग हे धाडसञ राबविण्यात यशस्वी होत आहे , पोलीस अधीक्षक पथकाने आज औराद शहाजनी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण व मिलन डे मटक्या वर धाडी टाकून आरोपीवर जुगार कायदा अंतर्गत कारवाई केली, तसेच आज गातेगाव पोलीसांनी सुद्धा धडक कारवाई सुरू केली आहे. मुरुड अकोला येथे मुरुड ते लातूर जाणाऱ्या रोडवर सायंकाळी ५ च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे सापळा लावला , तेव्हा एक पांढरी व्हिस्टा कार क्रमांक एम एच २४ व्ही ७३९१ येताना दिसली , त्या कार ला हाथ करून थांबवले असता आत मध्ये तीन इसम बसलेले आढळून आले , व पाठीमागील डिक्की तपासणी केले असता , त्या मध्ये दोन रबरी ट्युब मध्ये हातभट्टी दारू असल्याचे कळाले, त्या दोन्ही ट्युब मध्ये ९० लीटर हातभट्टी असल्याने त्याची किंमत ९००० व एक वापरलेली कार किंमत १ लाख ५० हज़ार असे १ लाख ५९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्या कारमधील आरोपी १} अच्युत सुभाष राठोड वय २७ रा. आरणी ता.जी.उस्मानाबाद २} राजेभाऊ अनील आडे वय २० रा.जवळगाव तांडा ता.अंबाजोगाई जि.बिड ३} ड्रायव्हर यशवंत लालसिंग राठोड वय ३१ रा.तावरजखेडा ता.जी.उस्मानाबाद या तिघांविरुद्ध गातेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे, पो.हे.बाबूराव डापकर, राजगीरवाड, पो.ना.शिरीष पाटील, एडके यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!