
औसा : { दिपक पाटील } लातूर ते लोदगा रोडवर गोद्री येथे एका पञ्याच्या शेडवर वेश्याव्यवसाय होत असल्याची माहिती औसाचे पोलीस निरीक्षक पटवारी यांना मिळाल्याने ,त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांना ही माहिती दिली व मार्गदर्शन घेऊन महीला पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे यांना खाञी करून कारवाई करण्यास सांगीतले ,घोरपडे यांनी ठाण्यातील सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे , डिगे, लामतुरे, फुले, महीला पोलीस पकाले व मदने यांना सोबत घेऊन गोद्री रोड असलेल्यां शेडवर छापा टाकून तेथील तीन महिलांची सुटका केली, व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता गोरख जिड्डे याने पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले असल्याची माहिती मिळाली, तिन्ही पिडीत महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले व तेथील चालक गोरख जिड्डे रा.गोद्री ह.मू.सम्राट चौक लातूर यास अटक करून त्याच्या विरोधात पोलीस स्टेशन औसा येथे गु.र.नं ३०४ ~ २०२१ कलम ३,४,५,७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शंकर पटवारी करीत आहेत.
