
भादा :-{ दिपक पाटील }आठवडय़ात अवैध धंद्यावर कारवाई चा पाऊस, आज रोजी भादा पोलीस स्टेशन हद्दीत,औसा ते तुळजापूर जाणारे हायवे रोडवरून महिंद्रा पीकअप क्र. एम.एच २५ एजे ०८४४ हा भाजीपाल्याची रिकामे कॅरेट व त्या कॅरेटचे खाली विदेशी दारू बॉक्स घेऊन जात असले बाबतची गुप्त माहिती मिळाल्यावर सदर पिकअप सापळा लावून तुळजापूर रोडवर चिंचोली(काजळी)पाटी येथून ताब्यात घेतला असून त्यामध्ये खालील विदेशी मद्य मिळून आले.
१)१,२२,८८०/- रु. : चे विदेशी दारू मॅकडोल कंपनीचे ४० बॉक्स ज्यामध्ये एकुण १९२० बाटल्या.
२)५२,२२४/- रू. चे विदेशी दारू IB कंपनीचे १७ बॉक्स ज्यामध्ये एकुण ८१६ बाटल्या.
३) ३,२०,०००/- महिंद्रा कंपनीचे पांढरे पिकअप. क्र.एम.एच .२५ ए.जे. ०८४४ असलेले ताब्यात घेण्यात आले आहे ,दोन्ही एकून ४,९५,१०४/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिकअप चालक दयानंद अरुण शिंदे, रा. नारी ता. बार्शी जी. सोलापूर.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास चालू आहे.
पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक, व पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस विलास नवले, पोलीस उपनिरीक्षक शिंदे , तसेच कर्मचारी गिरी, डोलारे ,फड,क्षिरसागर, चव्हाण,दिंडे यांनी केली आहे.
