Spread the love

भादा :- { प्रतिनिधि } आज ३ च्या सुमारास कमालपुर अमोल गणपत गिरी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून ५ आरोपींना पकडून अटक करण्यात आली. नूतन स. पो. नि. विलास नवले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एका दिवसात दोन ठिकाणी जुगारावर धाड टाकली. अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दनावले आहेत अनेक ठिकाणी अवैध धंदे करणारे लोक धंदा बंद करून बसले आहेत. या सिंघम अधिकार्‍याचे अनेक संघटनेद्वारे स्वागत केले जात आहे.
पो स्टे भादा हद्दीत, मौजे कमालपुर ता. औसा या गावात, पत्त्याची/जुगार रेड करण्यात आली रोख रक्कम, मो. फोन असा एकूण:२०,३४०/- रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

१} गोविंद माणिक गिरी,
२} संभाजी सुधाकर थोरे
३} दिपक मचिंद्रा थोरे
४} रामेश्वर वासुदेव मारडकर
५}भागवत पांडुरंग गिरी

या आरोपीविरुद्ध भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

मां. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक, व पोलीस उपअधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, पो.हे कमल उस्मान शेख, पो.ना- सूर्यवंशी ,पो.काॅ. दिंडे, यांनी कामगिरी बजावली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!