Spread the love


राष्ट्रीय महामार्ग 361 बनला मृत्यूचा सापळा
औसा 🙁 विलास) राष्ट्रीय महामार्ग 361 नागपूर रत्नागिरी महामार्गावर उजनी, तालुका औसा येथे पहाटे पाच च्या सुमारास अपघात, अपघातात एकजण ठार तर एक गंभीर जखमी, उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू, दररोज दहा हजार वाहनांची वर्दळ या महामार्गावर असते. त्यामुळे नेहमीच अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
औसा तालुक्यातील उजनी येथील राधाकृष्ण हॉटेल जवळ MT 07 HB 7578 या क्रमांकाचे ट्रक टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा केले असता, पाठीमागून KA 28 C 1040 या क्रमांकाचे ट्रक येत होते त्यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली यामधे ट्रकचा चुराडा झाला असून चालक ट्रक मध्ये अडकून बसला होता त्यावेळी उजनी येथील नागरिकांनी जेसीबी लाऊन चालकाची सुटका केली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला व त्याला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाला सोबत असलेला चौदा वर्ष वयाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याचे उपचार शासकीय रुग्णालयात सुरू आहे . चालक अनवीरय्या हीरेमठ वय 23 रा कान्होळी (कर्नाटक) हा येथील रहिवासी असून तुळजापूर येथून लातूरला जात असताना हा अपघात घडला. अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!