Spread the love

औसा :- (प्रतिनिधी) तालुक्यातील तपसेचिंचोली गावातील पथदिव्यांचे काम मार्गी लावण्याचा शब्द देणा-या तपसेचिंचोली येथील सरपंच विश्वंभर सुरवसे ,उपसरपंच युवराज यादव , विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे ,समाजसेवक राजेश्वर पाटील यांनी शिवशंकर माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने गावात पथदिवे बसवण्याचा निर्णय घेत, त्या कामाचा शुभारंभ 21 सप्टेंबर रोजी करण्यात आला. निवडणूकीत दिलेली आश्वासने निवडणूकी नंतर विसरुन जाण्यासाठीच असतात, अश्या पध्दतीने राजकारण करणारांना त्यांनी कृतीतून चपराक दिली आहे.

सन २०२१ मध्ये तपसेचिंचोली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान ग्रामपंचायतीच्या हद्दीत विद्युत पथदिवे बसवण्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन शिवशंकर माधवराव पाटील, विश्वंभर सुरवसे, युवराज यादव,प्रविण कांबळे ,राजेश्वर पाटील यांनी दिले होते. निधी उपलब्ध होण्यास अडचण असेल तर स्वखर्चाने पथदिवे बसवण्याचे काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यानुसार तपसेचिंचोली ग्रामपंचायतचे उपसरपंच युवराज यादव,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे , प्रशांत कुलकर्णी, बंडेश्वर मुळे, रामेश्वर वडगावे, सुरज मुळे , डिंगबर तेलंग , अरुणकांत गाडे,खंडू शिवरे ,राहुल घुळे, पद्माकर तौर यांच्या उपस्थितीत पथदिवे बसवण्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!