Spread the love


औसा { दिपक पाटील } औसा तालुक्यातील तुंगी गावातील ३१ वर्षीय गणेश शहाजी सूर्यवंशी याने ओळखीची १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने सतत बलात्कार केला.
सदरची पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिली असून तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून गर्भपात करण्यात आला आहे. आवश्यक नमुने रासायनिक तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले असून महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली गीते यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत.
त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील भागात राहणारा ११ वर्षीय मुलावर त्याच्याच चुलत भाऊ २२ वर्षीय समीर सय्यद याने त्यास घरात बोलावून घेऊन भीती दाखवून लैंगिक दुष्कृत्य केले. सदरील घटना ११ वर्षीय पीडित बालकाने आई आणि मामा यांना सांगितले त्यांनी औसा पोलिसांना सदरील घटना कळवली आरोपी समीर सय्यद यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र पीडित बालकांच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने महिला पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे यांच्या फिर्यादी वरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!