Spread the love

लातूर :{ दिपक पाटील } जिल्हा दुचाकी चोरी करणारे दोघेजण  एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केलीय. आरोपींकडून लातूर शहरातील विविध ०४ मोटर सायकलसह एकूण २ लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मोटर सायकलची चोरी करणाऱ्या आरोपींची नावं १} अविनाश फुलचंद राठोड ,वय ३२ रा.एमएसीबी काॅलनी, प्रकाश नगर लातूर व अमोल रमेश गडेराव वय ३० रा. सैनिकपूरी काॅलनी, लातूर अशी आहेत. या आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी दिली { Police action of bike thief in Latur 04 bikes siezed).

३० हजार रुपयांच्या तीन अक्टीवा व १ लाख ५० हजार रूपए किंमत असलेली एक बुलेट गाडी जप्त करण्यात आल्या आहेत, त्या पैकी एक अक्टीवा यायची बाकी आहे.

अशा विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करुन विक्री करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या. एमआयडीसीतील गून्हे प्रगटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कौशल्याने तपास करून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला ,या कार्यवाहीत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन व सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम चाकूर अतिरिक्त चार्ज लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड पो.हे.भिमराव बेल्लाळे, पो.ना.अर्जुन राजपूत, पो.ना.प्रशांत ओगले, पो.ना.मदने, पो.ना.शिंदाळकर यांनी सहभाग घेतला ,पूढील तपास स.फौ. सर्जेराव जगताप, देशमुख व चव्हाण करीत आहेत. #DSPNEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!