
भादा :- ( दिपक पाटील) भादा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी पदभार घेतल्या पासून अनेक अवैध धंद्यावर छापे टाकत आता पर्यंत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे , अवैध धंद्यावर अंकुश ठेवल्या मुळे धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत, त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार केला ,अवैध धंदे पोलीस स्टेशन हद्दीत चालणार नाहीत हे त्यांनी निर्देशित केले आहेत, असे असताना देखील काही महाभाग चोरून का होईना धंदा चालवत आहेत, हा धंदा चालवीत असताना एका खबर्याकडून पोलीसांना गोपनीय माहिती दिली,त्यावरून आज रोजी गुडगुडी वर छापा टाकून आरोपी- १.सखाराम कृष्णा चव्हाण व २.किसन पांडुरंग चव्हाण, ३. चोटू बळी जाधव सर्व रा. एकंबी तांडा.हे गावामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बसून बॅनर वर वरच्या बाजूस १ ते ५ कप्पे व खालच्या बाजूस ६ ते ० असे एकूण १० कप्पे असलेल्या बॅनरवर गुडगुडी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले,त्यावर छापा टाकून त्यामध्ये एकूण रु.५,३३०/- रोख व बॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व दुसऱ्या एका प्रकरणात २}आरोपी- दिलीप खेमराज चव्हाण हे पत्र्याचे शेडमध्ये हातभट्टी दारू २० लीटर, किंमत रु.२०००/- मालासह मिळून आला. व तिसऱ्या प्रकरणात आरोपी- धोंडीराम महादू जाधव हे शेतात हातभट्टी दारू ३० लीटर, किंमत रु.३०००/- मालासह मिळून आला. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलिस अधिक्षक अनुराग जैन, व पोलीस उपअधीक्षक दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, पो.हे. बंडू डोलारे,पो.ना. बापूसाहेब मंतलवाड,पो.काॅ. महेश चव्हाण,पो.काॅ. विठ्ठल दिंडे यांनी केली आहे. #DSPNEWS
