Spread the love

निलंगा : {  दिपक पाटील } गु-हाळ गावात आज भर दुपारी ३ वाजता बाहेरगावावरून घरी येऊन शेषाबाई मारूती दुधभाते वय ६५ वर्षे या आपल्या शेतात काही कामानिमित्त आल्या त्यांना पाहून बाजूच्या शेतात अगोदरच दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपीने सदरील महिलेच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसुञ कानातील असे एकून चार तोळे सोने हिसका मारून काढून घेतले. महिलेने आरडाओरडा करताच आरोपीने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने गळा वर घाव केला आरोपी बाजूच्या तळीखेड वाटेने उसातून पळून गेला आहे. लातूर जिल्ह्यात आरोपी पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून सध्या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी धावून आले असता सदरील आरोपी पळून गेला आहे.प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांनी सदरील व्यक्तीच्या अंगावर काळा पँन्ट व पांढरा शर्ट होता असे सांगितले आहे, घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे व निलंगा पोलिस निरीक्षक शेजाळ यांनी भेट देऊन पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!