Spread the love

भादा :- { दिपक पाटील } पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पथकाच्या पोलीसांनी दि. ०६ ऑक्टोबर रोजी भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ ठिकाणी छापे मारुन देशी- विदेशी दारु, गावठी मद्य जप्त करुन संबंधीत ४ व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये खालील प्रमाणे ४ गुन्हे नोंदवले आहेत.

१) पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या पोलीसांनी बेलकुंड मातोळा रोडवरील कवळी शिवारातील हॉटेल पुढारी येथे छापा टाकून अवैध विक्री व्यवसायासाठी बाळगलेलेल्या देशी व विदेशी दारु अं. किं. १९७० रुपये व रोख रक्कम ५९०० रुपये देवताळा येथील आरोपी शशिकांत चव्हाण यांच्या ताब्यातून जप्त केल्या.

२) दुसऱ्या घटनेत बेलकुंड – मातोळा रोडवरील हॉटेल मातोश्री लंच होम येथे छापा टाकून देवताळा येथील आरोपी रविकिरण चव्हाण यांच्या ताब्यातून देशी दारुच्या १५ बाटल्या जप्त केल्या आहेत. त्याची अंदाजे किंमत ९०० रुपये इतकी आहे.

३) तिसऱ्या घटनेत जायफळ गावातील मेंढा मोडवर असलेल्या भक्ती पान स्टॉल मध्ये छापा टाकून आरोपी नरसिंग बलभीम भोंग रा. जायफळ ता. औसा यांच्या ताब्यातून दोन केशरी रंगाच्या घागरीमध्ये गावठी हातभट्टी दारू ३० लिटर चोरटा विक्री व्यवसाय करताना (अंदाजे किंमत १५००/- रुपये) व रोख रक्कम १०६० रुपये जप्त केला आहे.

४) चौथ्या घटनेत जायफळ गावातील रोडलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून आरोपी शुक्राचार्य भगवान भोंग रा. जायफळ ता. औसा यांच्या ताब्यातून दोन केशरी रंगाच्या घागरीमध्ये व एका पांढऱ्या रंगाच्या कँडमध्ये गावठी हातभट्टी दारू ४० लिटर चोरटा विक्री व्यवसाय करताना (अंदाजे किंमत २०००/- रुपये) व रोख रक्कम १९१० रुपये जप्त केला आहे.

वरील नमुद ४ व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये भादा पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंदवले असून नमुद आरोपीकडून अवैध देशी विदेशी, गावठी दारु, रोख रक्कम सह एकूण १५२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथक पोहे लक्ष्मीकांत देशमुख, पोना केशव जायभाये, रमेश चौधरी, पोशि गणेश खंदाडे, चापोना क्षीरसागर यांच्या पथकाने भादा पोलीस ठाण्यातील बेलकुंड भागातील बिटजमादार सतीश सारोळे व भादा बिटचे जमादार डोलारे यांच्या समवेत केली . #DSPNEWS

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!