उदगीर (दिपक पाटील) : अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी उदगीर येथे दोघांस अटक करण्यात आली. आरोपी संतोष गुरुनाथ डोनगापुरे वय ३२ वर्ष, रा. रावणगाव ता. उदगीर जि. लातूर, २) चंद्रकांत गंगाधर झटकवडे वय २७ वर्ष रा. चांडोळा ता. मुखेड जि. नांदेड असे अटक केलेल्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून एकूण तब्बल ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्तबातमीदारामार्फत उदगीर ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ,दि.५ ऑक्टोबर रोजी उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून शेल्हाळ रेल्वे गेटजवळ महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ सुगंधी तंबाखू पानमसाला जवळ (अवैध गुटखा एकूण किंमत १,४०,६१५ रुपये व अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन केए ३९. ६८५०. अंदाजे किंमत ३ लाख रुपये असा एकूण ४,४०,६१५ रुपयांचा ) अवैध मुद्देमाल बाळगताना आढळून आल्याने अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य जनहितार्थ काढलेला आदेश माहिती असून सुद्धा त्याचे उल्लंघन केले व अन्नसुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केले व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्री हेतू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. यावरून वरील नमुद २ आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी लातूर विठ्ठल लोंढे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं ४१८/२१ कलम १८८,२७२, २७३, ३२८,३४ भादवी सह कलम ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस उपाधीक्षक उदगीर डॅनियल बेन, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, पोलीस नाईक राम बनसोडे, विशाल गुंडरे, तुळशीराम बरुरे,राहुल गायकवाड यांच्या पथकाने बजावली आहे.तर गुन्हा दाखल पोलीस उपनिरीक्षक टि. डी. चेरले यांनी केला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जोंधळे हे करत आहेत. #DSPNEWS
