
नांदेड (प्रतिनिधी) : दि.८ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील मुसलमान वाडी पाटी जवळ विनापरवाना कॉफी शॉप चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली वरून पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी सहपोलीस संकेत दिघे, इतवारा उपविभाग दामिनी पथकाचे प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक पी. आर. बाभळे व मपोकॉ उज्वला दिग्रसे, पोना राजेश माने, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकातील पोलिस अमलदार पोना प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव पोकॉ विश्वनाथ पवार हे मिळालेल्या माहितीनुसार रवाना होऊन मुसलमानवाडी पाटी येथे लव बर्ड कॉफी शॉप वर दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास छापा मारला असता सदर कॉफी शॉप वरील एका रूम मध्ये एक मुलगा व एक मुलगी असे अश्लील कृत्य करीत असताना मिळून आले सदर ठिकाणावरून लव बर्ड कॉफी शॉप चे मालक सुनील वेरुळकर वय ४८ वर्षे रा. चौफाळा नांदेड व एक मुलगा एक मुलगी असे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे घेऊन आले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदरील उल्लेखनीय कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग इतवारा सिद्धेश्वर भोरे यांनी विशेष अभिनंदन केले. #DSPNEWS
