
लातूर (दिपक पाटील): पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम ( अतिरिक्त चार्ज उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक शंकर मोरे, व डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलारी, शिंदे, नाईक सारोळे, नामदास, कलकत्ते,पोशि नलवाड सर्व पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर व नाईक संतोष देवडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश साठे, नेमणूक सायबर सेल लातूर यांनी पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे दाखल गुन्ह्यांपैकी गेल्या तीन दिवसात पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी खालीलप्रमाणे तीन घरफोड्या व एक चोरी उघडकीस आणून गेलेला माल नमूद आरोपी कडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी कामगिरी केलेली आहे.
१) पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर गुरनं ४१४/२०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घरात लोखंडी कपाटातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, सव्वा तोळ्याची गळ्यातील सोन्याची साखळी तसेच चांदीचे दागिने असे एकूण १,४४,९९०/- रुपये मालाची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली होती सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे राहुल चंद्रकांत वाघमारे वय 28 वर्षे रा.म्हाडा कॉलनी लातूर यांस दिनांक ३ ऑक्टोबर रोजी अटक करून आरोपी कडून गेलेल्या माला पैकी साडे तीन तोळे सोन्याचे गंठण किंमत अंदाजे १ लाख ५ हजार जप्त करण्यात आलेले आहे.
२) पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर गुरनं ३३०/२०१८ कलम ४५७, ३८० भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी चे घरातील कपाटाचे लाॅकर मधून एक तोळे सोन्याची चैन व रोख २५०० रुपये असा एकूण २२५०० रुपयेचा माल चोरून नेला होता. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे राहुल चंद्रकांत वाघमारे वय २८ वर्षे रा.म्हाडा कॉलनी लातूर याच्या कडून गेलेल्या माला पैकी १ तोळे सोन्याची चैन किंमत अंदाजे २०,०००/- जप्त करण्यात आलेली आहे.
३) पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर गुरनं ५४३/२०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील दीड तोळा सोन्याची मनी मंगळसूत्र, चांदीचे २० तोळे वजनाची गणपतीची मूर्ती, रोख १० हजार रुपये असा एकूण ६२०००/- रुपये चा माल व फिर्यादीचे घराचे बाजूला राहणारे प्रशांत शशिकांत कुलकर्णी यांचे घरातील लोखंडी कपाटातील चांदीचे पाच तोळ्याचा करंडा व रोख ९०००/- रुपये असा एकूण १०,७५०/- रुपये अशाप्रकारे फिर्यादी व साक्षीदार यांचे मिळून एकूण ७२,७५०/- रुपये चामाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले वरून गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे राहुल चंद्रकांत वाघमारे वय २८ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी लातूर यास दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी अटक करून त्याच्याकडील गुन्ह्यातील गेलेल्या माला पैकी दीड तोळा सोन्याचे मणी मंगळसूत्र किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये व एक चांदीचा पाच तोळ्याचा करंडा किंमत अंदाजे १७५० रुपये असा एकूण ४६७५०/- रुपये चा माल जप्त करण्यात आला आहे.
४) पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर गुरनं ६५६/२०२१ कलम ३७९ भादंवि मधील अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी घरासमोरील एक सायकल किंमत अंदाजे ३००० /- रुपयाची चोरून नेली होती त्यामध्ये आरोपी नामे छोटुसाब बशीरसाब सय्यद वय ४१ वर्षे, रा. हरंगुळ ता.जि.लातूर यास दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी अटक करून नमूद आरोपी कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल किंमत अंदाजे ३०००/- रुपये ची जप्ती करण्यात आली आहे. #DSPNEWS
