किनगाव ( प्रतिनिधी ) रेणापुर तालुक्यातील माकेगाव येथील २६ वर्षीय . विवाहित महिलेच्या हाताला धरून माझ्यासोबत चल म्हणून विनयभंग केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात शनिवारी सायंकाळी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
…… माकेगाव येथील विवाहित महिला शेतातील काम आटपून गुरुवारी सायंकाळी ६.०० वा .घराकडे येत होती. यावेळी याच गावातील पद्माकर ज्ञानोबा लहाने यांनी महिलेचे हाताला धरून तू माझ्यासोबत चल म्हणून जबरदस्ती करू लागला . त्यावेळी महिलेने असे करू नको, नाहीतर माझ्या नवरा, सासू-सासरे यांना सांगेन. असे म्हणून म्हणत असताना ,जर माझ्यासोबत नाही आलीस तर गावात व पाहुण्यात तुझी बदनामी करून तुझी वाटोळे करीन अशी धमकी दिली. या पीडित महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात आज शनिवारी सायंकाळी गुरन 270 / 21 कलम 354, 506 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ एम एस पलमटे हे करीत आहेत.
