लातूर :- { दिपक पाटील } दिनांक ८-१०-२१ ते ११-१०-२१ या कालावधीत बाभळगाव रोड वरील सांज बार चे गोडाऊन फोडून १ एल. जी. कंपनीची एलईडी व भांडे असा एकूण ३२००० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता , सांज बार चे मालक कल्पक श्रीराम गोजमगुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध १२-१०-२१ रोजी गु.र.नं. ६६७-२०२१ कलम ५४५,४५७,३८० भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने शहरात गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचे काही सुगावा लागतो का ? या साठी आपले खबर्याचे जाळे विणले, दिनांक १४-१०-२१ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने बालीका उर्फ टेनी करण कांबळे हिला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिची चौकशी केली असता तिच्या घरी गोडाऊन फोडतील एल जी कंपनीची २००००, रूपयांची एलईडी टि.व्ही, आढळून आली ती ताब्यात घेऊन तिचे ईतर साथीदार २} नयना सुनील कांबळे ३} लक्ष्मी परमेश्वर कसबे ४} कोमल अविनाश काळे ५} सोनू महेश काळे सर्व रा. विलास नगर लातूर हे सर्व मिळूण पहाटे कचरा वेचण्यासाठी गेल्यावर, सदरील गोडाऊन चे कुलूप तोडून आत प्रवेश केला व एलईडी व भांडे चोरून घेऊन आटो रिक्षाचालक सचिन उर्फ बंडू बलभीम कांबळे याच्या आटोत टाकून घेऊन गेले असल्याची कबुली दिली, सदरील महिलेस मुद्देमाल हस्तगत करून विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले व इतर महिलांचा शोध घेणे चालू आहे, सदरील कार्यवाहीत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन व उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील सहा.पो.उप.नी. वाहिद शेख ,सहा.पो.उप.नी. रामचंद्र ढगे, पो.ना.अभिमन्यू सोनटक्के पो.ना.महेश पारडे व म.पो.ना.मंगल पारवे यांनी विशेष परिश्रम घेत गुन्हा उघडकीस आणला.
