Spread the love

लातूर (दिपक पाटील) :  लातूर शहरातील बार्शी रोड वरील माऊली नगर, हरंगुळ (बु)परिसरात कुंटणखाणा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक पथकातील पोलीसांना मिळाली होती. उड्डाण पुल बार्शी रोड माऊली नगर येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलीसांनी यांनी डमी ग्राहक पाठवून मिळालेल्या गोपनीय माहितीची खातरजमा करून मंगळवारी सव्वा पाचच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना मालकिन १}किरण उर्फ उषा शंकरराव कासले वय ४५ रा.माऊली नगर लातूर हिच्यासह वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तीन महिला, व तिचा मुलगा २} ऋषिकेश शंकर कासले वय २४ रा. आनंदवाडी ता.रेणापूर जि.लातूर ३} राम पंढरीनाथ येलाले वय ३६ रा. विठ्ठल रुक्मिणी नगर लातूर हे तिघे स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरील महीलांना पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणत असत तसेच वेश्यागमनासाठी आलेले ४} व्यंकट जिवणराव मुसळे वय ३५ रा.५ नंबर चौक लातूर ५} निरंजन सोमनाथ क्षिरसागर वय १८ रा.इंडीया नगर लातूर ६} प्रितम लिबांजी गाढेराव वय २५ रा.इंडिया नगर लातूर ७} आकाश दलीत ढोबळे वय २८ रा.मोती नगर लातूर ह.मू.पुणे या ग्राहकांना रंगेहात ताब्यात घेतले. यात वेश्‍या व्यवसायासाठी कुंटणखाना महिलेने बाहेर गावातील तीन महिलांना बोलावून घेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या राहत्या घरामध्ये वेशाव्यवसाय करवून घेत आणल्याचे उघड झाले. समाजसेविका असल्याचा बनाव करून ही महिला पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढत असल्याचे दिसून येते. कुंटनखाना मालकीणीचा मुलगा व आतेभाऊ हे दोघे येथे ग्राहकांना व पीडित महिलांना घेऊन येत असल्याची माहिती समोर आली असून ते दोघेही त्या ठिकाणी बसलेले आढळलेले आहेत. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३,४,५,७{१} व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ व कलम ३७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली गित्ते करीत आहेत. सदरील कार्यवाही यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम चाकूर यांच्यासोबत पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले , महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गित्ते, पो.शी. खोसे,पो.शी .केन्द्रे, चा.पो.शी.रायभोळे, दामिनी पथकातील म.पो.शी सोनाली ढगे चालक जोगदंड , शिंगाडे, गोडबोले यांनी सहभाग घेतला. तसेच त्याच वेळेस विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीत १} मीना मधुकर शिंदे.वय वय ३२ रा. Mit कॉलेज जवळ.
२}. योगेश विश्वासराव हरके वय ३६ रा. मजगे नगर.
३. सुरज बालाजी कांबळे वय २८ रा सिद्धार्थ सोसायटी लातूर
याच्याविरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात त्याच कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ची कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक गळगटे, पो.हे.फुलारी, गुंडरे, पो.ना.ढगे,कलकत्ते, नामदास, पो.काॅ. शिन्दे, नलवाड यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!