
लातूर : { दिपक पाटील } एमआयडीसी पोलिसांना मोटरसायकल चोरीचा सुगावा लागल्याने मोटरसायकल चोरांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी २ आरोपी गाड्या चोरणारे व चोरीच्या गाड्या विकत घेणारे ३ अशा ५ आरोपींना अटक करण्यात आली असून ११ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. लातूर शहरात तसेच जिल्ह्य़ातील मोटरसायकल चोरांकडून गाड्या चोरण्याचे प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात व एमआयडीसी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड यांची सर्व टिम मोटरसायकल चोरांचा बिमोड करण्यासाठी कामाला लागली, टिम पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मोटरसायकल चोरांची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक संदीप कराड पोलिस हेड काॅन्स्टेबल भिमराव बेल्लाळे, शिंगाडे , पो.ना. अर्जुन राजपूत,प्रशांत ओगले, मुन्ना मदने, कज्जेवाड, शिंदाळकर, पो.शी.जाधव, दुधभाते, बोपले, ,चा.पो.शी. गोडबोले यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केलेली संशयित मोटारसायकल त्या ठिकाणी मिळून आल्याने त्याबाबत आरोपी १} संतोष सोपान माने वय २४ रा. लोदगा ता.औसा.जि. लातूर यास विश्वासात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली व त्याचा दुसरा साथीदार २} अंकुश राम कांबळे वय ३० रा.वसवाडी ता.जी.लातूर यांना ताब्यात घेतले असता त्यांनी अनेक लोकांना मोटरसायकली विक्री केल्याचे समजले. मोटरसायकल देताना ते कागदपत्र नंतर देतो, असे सांगत असे. या माहितीवरून त्यांना चौकशीकरिता ताब्यात घेऊन सखोल माहिती हाती आली. त्याने मागील कालावधीत वेळोवेळी १० ते २० हजार रुपये प्रत्येकी मोटरसायकली विक्री केल्याचे समजले, चोरीची मोटरसायकल कोण खरेदी केली याची माहिती घेतली असता, १} शेख सिद्धीक खय्यूम व २} लक्ष्मण मनोहर कांबळे दोघंही राहणार सकपाळ नगर, लातूर ३} अदील उस्मान कुरेशी रा.हत्ते कार्नर लातूर यांना ताब्यात घेऊन विविध पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या चोरीच्या ११ मोटरसायकल असा ७ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने काम कौशल्याने केले. या कारवाईत पाच आरोपींना अटक करून एकूण ११ मोटरसायकल हस्तगत केली आहेत. मोटरसायकल चोरी करणारे व विक्री करणारे यांनी संगनमताने सामान्य लोकांना विशेषतः खेड्यातील लोकांना गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याची पद्धत अवलंबल्याचे समोर आले आहे. कोणीही नागरिकांनी विना कागदपत्र वाहन विकत घेऊ नये अशी वाहने चोरीची असल्याचे समजल्यानंतर पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी केले, पुढील तपास पो.हे. बिराजदार, देशमुख, पो.ना. घुले करीत आहेत.
