
लातूर { प्रतिनिधि }: लातूर येथील उद्योजक विनोदकुमार गिल्डा यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूरचेच दुसरे एक उद्योगपती दिनेश मुरलीधर इनानी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश लातूरच्या प्रथम वर्ग ६ यांनी दिले आहेत. लातूरचे उद्योजक विनोदकुमार रामगोपालजी गिल्डा यांनी लातूरच्या उद्योग भवन परिसरातील महाराष्ट्र शासनाची जागा, जी लातूर औद्योगिक सहकारी संस्थेकडे भाडे तत्वावर आहे. त्याचा प्लॉट क्र. ९० हा पोट भाडेपट्ट्याने घेतलेला आहे. हा प्लॉट लातूरचेच दुसरे एक उद्योगपती दिनेश मुरलीधर इनानी यांनी त्यांच्या राजलक्ष्मी पेट्रोकेम प्रा. लि . साठी औद्योगिक वसाहतीचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन लघु उद्योग बँक, मुंबई यांच्याकडे सन २००४ साली तारण करून दिला होता . सन २०१४ मध्ये सदरील कर्ज परतफेड झाल्यानंतर सदरील लघु उद्योग बँकेकडे दिलेली ही कागदपत्र दिनेश इनानी यांनी विनोदकुमार गिल्डा यांच्या परस्पर हस्तगत करून जनता सहकारी बँक लि. , पुणे यांच्याकडून १२ कोटी रुपयांच्या कर्जासाठी खोटे दस्तावेज तयार करून, त्यावर विनोदकुमार गिल्डा यांच्या खोट्या सह्या करून तारण ठेवल्याचे दाखवले. याकामी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचे दिसते . ज्यावेळी गिल्डा यांना आपल्या अन्य व्यवहाराकरिता या प्लॉटच्या ओरिजनल भाडेपट्ट्याची आवश्यकता पडली, त्यावेळी त्यांनी दिनेश इनानी यांच्याकडे दस्तावेजाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. इनानी याप्रकरणी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येताच गिल्डा यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या प्लॉटचे ओरिजनल दस्तावेज दिनेश इनानी यांनी विनोद गिल्डा यांच्या परस्पर पुणे जनता बँकेकडे तारण ठेवल्याचे निदर्शनास आले.
