
भादा :- { दिपक पाटील } मौजे कोरांगळा ता.औसा येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर ओढ्यामध्ये सिंधीचे झाडापासून विनापरवाना सिंधी काढून त्याची विक्री होत असल्याबद्दल बाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पहाटेपासून सापळा लावून सिंधी काढत असलेल्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. सदर ठिकाणी असलेल्या झाडापासून शासनाचा कोणताही परवाना न घेता सिंधी काढून त्यांची विक्री केली जात होती.आज १७~११~२१ रोजी दुपारी २ वाजता धाड टाकून सिंधी काढत असताना आरोपी कृष्णा विठ्ठल भाईकडी(गौड), वय ५७ वर्ष. रा. कोरांगळा ता. औसा याला रंगेहात पकडण्यात आले.सींधीचे झाडावर लावलेले मटके, बॅरेल, प्लास्टिक कॅन, मातीचे मटके यामध्ये असलेली जवळपास ८०० लीटर सिंधी पकडण्यात आली असून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरील कार्यवाही यशस्वी करण्या साठी पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलिस अधिक्षक अनुराग जैन व उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गिरी ,पो.हे.देवकर, पो.ना. चंद्रकांत कलमे,पो.काॅ.विठ्ठल दिंडे, पवार, व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गणेश गोळे, कुबडे, मुंडे ,देशपांडे, यांनी केली आहे.
