किल्लारी :- { प्रतिनिधी} किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीत गाढवेवाडी येथील शेतातून काल दि 18/11/2021 रोजी रात्री बैल चोरीची घटना घडली होती,त्याबाबत किल्लारी पोलीस स्टेशनला गु .र .नं . 232/2021 आईपीसी 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पो हवा उस्तर्गे करत आहेत. रात्रगस्ती वरील पोलीस नाईक साळुंखे यानी लागलीच गोपनीय माहिती काढली असता त्यात सदरची चोरी गाढवेवाडी तांडा येथील 1)विकास प्रभू चव्हाण 2)पप्पू श्यामराव राठोड 3)विजयकुमार वसंत राठोड यांनी केल्याचे निष्पन्न झाले.त्यातील पप्पू राठोड व विजयकुमार राठोड या 2 आरोपींना अटक करुन चोरलेला बैल ताब्यात घेण्यात आला आहे. सदर कामगिरी मुळे विनायक निंबाळकर या शेतकरी यांनी किल्लारी पोलीस स्टेशन च्या टीम स्टाफचे आभार व्यक्त केले.सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड,पो. हवा सचिन उस्तर्गे,पो. ना. साळुंखे,पो. हवा. मर्डे यानी केली.
