
रेणापूर { दिपक पाटील } : पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी सांगत असतात , सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना गुप्त बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली की पानगाव ता. रेणापूर येथील रमाकांत संपते यांच्या शेतातील गोठ्यात स्वतःच्या फायद्यासाठी तिर्रट नावाच्या जुगाराचा खेळ खेळत व खेळवीत आहेत. मिळालेल्या माहितीवरून आधारे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शन घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथक आणि रेणापुर पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीसांच्या मदतीने दि.१८ नोव्हेंबर रोजी अंदाजे सहा ते साडे सहाच्या वाजण्याच्या दरम्यान पानगाव येथे रमाकांत संपते यांच्या शेतातील गोठ्यात अचानकपणे छापा टाकला असता ,त्या ठिकाणी २५ लोक वर्तुळाकार बसून पत्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत खेळवीत असताना मिळून आले. तिर्रट खेळत व खेळवीत असलेल्या लोकांना त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्याचे नावे १} लखन सुरेश बघीले वय २५ वर्ष रा.पानगाव, २}चंद्रकांत विलास पेददे, वय ३० वर्ष रा.पानगाव, ३} महेश दगडु डोंगरे, वय २० वर्ष रा.पानगाव, ४} हुसेन रसुल सय्यद, वय ७० वर्ष रा. मलिकपुरा परळी वै. जि.बीड, ५}नरसिंग दिगंबर कांबळे, वय २१ वर्ष रा.वालेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड ६} अविनाश प्रताप चिताडे, वय २५ वर्ष रा. नरवटवाडी, ७} शिवकुमार सदाशिव छत्रबंद, वय ३२ वर्ष रा. खाडगाव रोड लातूर, ८} महादेव भिवाजी कलवले, वय २६ वर्ष रा. पानगाव, ९} सुरज उत्तम हरिदास, वय २१ वर्ष रा. पानगाव, १०} अशिष रामेश्वर पेददे , वय २२ वर्ष रा. पानगाव, ११} लक्ष्मण वैजनाथ पेददे, वय ३१ वर्ष रा. पानगाव, १२} वैभव शिवसिंग बायस, वय २१ वर्ष रा. पानगाव, १३} मंजुर पैगंबर शेख, वय ३५ वर्ष रा. पानगाव, १४} रमाकांत लिंबाजी संपते, वय ३८ वर्ष रा.पानगाव, १५} भैय्या निवृत्ती आचार्य, वय ३८ वर्ष रा. पानगाव, १६} नरसिंग गोविंद जांभळे , वय २४ वर्ष रा.नरवटवाडी, १७} युवराज प्रल्हाद शिंदे , वय ४० वर्ष रा. मदने चौक, लातुर, १८} मारुती केरबा कुरे , वय ३९वर्ष रा.पानगाव, १९} बलभिम तुळशीराम हजारे, वय ४५ वर्ष रा. पानगाव, २०} ज्ञानोबा सोना जाधव, वय ४५ वर्ष रा. सत्तरधरवाडी तांडा, ता.औसा, २१) भागवत श्रीहरी वांगे , वय ५२ वर्ष रा. पानगाव, २२} गिरीष बालाजी हानवते, वय २४ वर्ष रा. पानगाव, २३} अनसर नाजोद्दीन शेख, वय ३२ वर्ष रा.पानगाव, २४} निखील दत्ता वांगे, वय २४ वर्ष रा.पानगाव, २५} इब्राहिम शेख रा.पानगाव यांना अटक करुन ,त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल,वाहन असा एकुण ६,५६,०३०/- रु. { सहा लाख छप्पन्न् हजार तीस रुपये) रुपयाचे मुद्देमाल मिळुन आल्याने पो.स्टे. रेणापुर येथे गु.र.नं. ४६९/२०२१ कलम १२ (अ) मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास रेणापूर पोलीस करत आहेत.
