Spread the love

उमरगा :- { प्रतिनिधी } 8 दिवसांनी फरार आरोपी जेरबंद
उमरगा पोलिसांच्या शोधपथकाची धाडसी कार्यवाही

पोलीस स्टेशन उमरगा गुरन 371/2021 कलम 379 मध्ये हस्तांतरीत करून आणलेला सराईत मोटारसायकल चोरीतील आरोपी राजू उर्फ गुडया मधुकर पवार रा. सारोळे ता. मोहोळ जि. सोलापूर यास न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सबजेल पंढरपूर येथे जमा करण्यासाठी जात असताना दि.13/11/2021रोजी रात्री 01.00 वा. मोहोळ जि. सोलापूर येथून उमरगा पोलिसांच्या ताब्यातुन पळून गेला होता. त्याला शोधून ताब्यात घेण्यासाठी पोलीस ठाणे उमरगा येथील सहायक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांचे नेतृत्वाखाली पो.ना जाधव, पो.कॉ गजभार, पो.कॉ. दिवे यांचे शोधपथक रवाना झाले होते. सदर फरार आरोपी पुणे शहरात तसेच पंढरपूर व मोहोळ जि. सोलापूर व इतर शहरात फरार होऊन पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. परंतु दि. 20/11/2021 रोजी रात्री सदर आरोपी विटे पोहोरगाव ता. पंढरपूर येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे व सोबत पोलीस नाईक जाधव, पो.कॉ. गजभार व पो.कॉ दिवे यांनी धाडसी सापळा रचून सदर फरार आरोपीस मौजे विटे-पोहोरगाव ता.पंढरपूर येथुन पळून जात असताना पाठलाग करून झडप घालून ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही साठी मोहोळ पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहे.सदरची कार्यवाही निवा जैन , पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा तसेच आघाव, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उमरगा यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे व पथकाने केली आहे, त्यामुळे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!