Spread the love

लातूर :  { दिपक पाटील } शहरातील मंगल कार्यालय,लाॅन्स, वर्दळीचे ठिकाण, दवाखाने, रस्त्यावर मोबाईलवरून बोलत चालत जाणारे ,गल्लीबोळातून जाणारे पादचारी यांचेकडून मोबाईल फोन जबरदस्तीनं पळणार्‍या चोरणाऱ्या चोरांचा शोध घेण्याकरिता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पथक गस्त घालीत असताना ,मोबाईल चोर नामे १} सुशन जगन्नाथ कणसे वय २४ वर्ष रा. मोती नगर लातूर २ } प्रदीप संभाजी सुर्यवंशी वय २६ वर्ष रा. दगडवाडी ता. निलंगा ह.मु. अजिंठा नगर लातूर ३} ओमकार संभाजी सुर्यवंशी वय १९ वर्ष रा.महात्मा गांधी नगर लातूर हे तिघा चा हातखंडा असू शकतो ,असल्या कारणावरून पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याना पकडून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, गु.र.नं.३०१,३०३,/२०२१ कलम ३९२,३४ भादवि नुसार शोध नुसार त्यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा A 7 रेड मी नोट मोबाईल व अन्य पाच मोबाईल असे एकूण ६ मोबाईल किंमत ५७००० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व एक मोटारसायकल MH-२४ BF ९१४८ ही हस्तगत करून असा जवळपास १,१३००० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला व त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सुनील पुजारी यांच्या नेतृत्वात म.पो.उपनिरीक्षक एस.आर. देशमुख, स.पो.उपनि.काझी, पो.हे. चौगुले, पो.ना.शिंदे, पो.ना. देशमुख, पो.ना. चामे, पो.शी. बोचरे, जाधव, हणमंते यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!