Spread the love


अहमदपूर :- ( प्रतिनिधी) दगडवाडी ता अहमदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत अनेक अफरातफर असताना व याची चौकशी करावी अशी तक्रार मा जिल्हाधिकारी साहेब यांना दिली असता त्याची चौकशी चालू असताना ग्रामपंचायत ग्रामसेवक जवळच्या लोकांना मी तुमचे घरकुल मंजूर करून देतो असे म्हणत कागदपत्र गोळा करून घेत आहे याबद्दल गावातील लोकांत असंतोष निर्माण झाला आहे व लोकांनी सर्व यादीची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय व गावाच्या समोर नवीन यादी बनवावी व जुनी रद्द करण्यात यावी नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
संगणक चालकाच्या नजरचुकीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी चुकीची करण्यात आली होती. अनेकाच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी नविन कमिटी नियुक्त करून पात्र लाभार्थ्यांची यादी करण्याचे काम सुरू आहे , पात्र लाभार्थ्यांची यादी महिनाअखेर पूर्ण होईल अशी माहिती पट्टेवाड  यांनी दिली.  
अहमदपुर तालुक्यातील दगडवाडी या गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याची यादी जाहीर झाली होती. याच गावातील श्रीकांत मुंडे यांनी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकाय यंत्रणा लातूर यांना  तक्रारी द्वारे यादीमध्ये नोकरदार व बड्या व्यक्तीचा समावेश असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तेव्हा ही यादी रद्द करून खऱ्या लाभार्थ्यांची नविन यादी करण्याची आदेश देण्यात आले होते. सदरील पात्र यादी करण्याचे काम नुतन स्थापित कमिटी करत आहे. या कमिटीमध्ये विस्तार अधिकारी पं. स., इंजिनीयर बांधकाम पं. स.,अंगणवाडी सुपरवायझर व ग्रामसेवक यांचा सामावेश आहे. नुतन पात्र लाभार्थ्यांची यादी महिनाअखेर पूर्ण होणार आहे . अशी माहिती विस्तार अधिकारी आर.व्ही. पट्टेवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!