लातूर : दि.०६ { दिपक पाटील } लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतरही संपत्तीतून व समाधी स्थळावरून कलह निर्माण झाला आहे. मठाची संपत्ती व समाधी स्थळाची पेटी हलवून महाराजांचे काही जवळचे नातेवाईक आणि कार्यकारणीतले काही सदस्य हे भांडवल सुरु करीत असल्याचा आरोप शिवा लिंगायत युवक संघटनेने केला आहे.त्यामुळे समाधीच्या जागेवर पोलीस देखरेख आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या अंतीम सहा महिन्यांच्या जीवन शैलीची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी ही संघटनेने केली आहे. या मागणीसाठी लातूरच्या महात्मा गांधी चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.शासकीय इतमामात महाराजांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अशा पद्धतीने समाधीसाठी भांडवल करण्याचा प्रयत्न लिंगायत समाज हाणून पाडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. गतसाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूपूर्वी लातूर आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी यांनी इन कॅमेरा केलेली व्हिडिओ सीडी सार्वजनिक करावी. त्यामुळे महाराजांचा वारसदार कोण आहे हे ही जगासमोर येईल असेही मत यावेळी आंदोलकांनी नोंदविले आहे.
